facebook pixel
chevron_right Top
transparent
पुढच्या हंगामात केंद्र सरकार 50 लाख टन साखर निर्यात करणार
साखर कारखान्यांना प्रतिटन 140 रुपये देण्याचा प्रस्ताव आहे. सागर किनारी भागात दोन हजार पाचशे रुपये, तर अंतर्गत भागात तीन हजार रुपये वाहतूक अनुदान दिले जाणार आहे. विक्रमी उत्पादनामुळे घसरलेल्या दरांवर उतारा म्हणून केंद्र सरकार पावलं उचलत आहे. 50 लाख टन साखर निर्यात झाली तर देशांतर्गत साखरेचे दर वाढतील. अन्न मंत्रालयाने हा प्रस्ताव तयार केला असून पुढच्या आठवड्यातल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. भारत सरकारने असं अनुदान दिल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर नवा पेच उभा राहू शकतो.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App