facebook pixel
chevron_right Top
transparent
नितीश कुमारांची ताकद वाढली; पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांचा जेडीयूत प्रवेश
निवडणूक जिंकण्यासाठी अचूक रणनीती आखण्यात माहीर असलेल्या प्रशांत किशोर यांनी रविवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत संयुक्त जनता दलात प्रवेश केला. बिहारमधून नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी मी खूपच उत्साही असल्याचे ट्विट त्यांनी केले. पाटणातील जेडीयूच्या कार्यकारिणीच्या बैठकीत नितीशकुमार यांनी किशोर यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. २०१४ साली भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशात प्रशांत किशोर यांच्या निवडणूक व्यवस्थापनाचा मोठा वाटा होता. यानंतर बिहार विधानसभेच्या निवडणुकीतही प्रशांत किशोर यांनी या कामगिरीची पुनरावृत्ती केली होती.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App