facebook pixel
chevron_right Top
transparent
पेट्रोलचे दर वाढल्याने फरक पडत नाही, मला फुकटात मिळते
इंधन दरवाढीमुळे जनतेमध्ये निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी मोदी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यामुळे विचका झाला आहे. रामदास आठवले यांनी एक वादग्रस्त विधान करुन या आगीत आणखीनच तेल ओतले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किमतींमुळे मला काही फरक पडत नाही. कारण मंत्री असल्यामुळे मला ते फुकटात मिळते. कदाचित माझे मंत्रीपद गेल्यानंतर मला त्याची झळ बसेल. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता इंधन दरवाढीमुळे जनता मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे. त्यामुळे इंधनांच्या दरांमध्ये कपात झाली पाहिजे, असे शहाजोग विधान आठवले यांनी केले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App