facebook pixel
chevron_right Top
transparent
कोलकातामध्ये बगाडी बाजारात भीषण आग-Maharashtra Times
कोलकातामधील बगाडी बाजारात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. बगाडी बाजारात पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास एका पाच मजली इमारतीला आग लागली. आग लागलेल्या इमारतीच्या ठिकाणी पोहचण्यासाठी अग्निशमन दलाला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. या इमारतीच्या वाटेत इमारती, लोकवस्ती असल्यामुळे आग विझवण्याच्या प्रयत्नात अडचणी येत होत्या.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App