facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
हनी सिंगच्या 'या' गाण्याने तोडले यूट्युबवरील सर्व रेकॉर्ड
तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेला गायक हनी सिंग याच्या नव्याने प्रदर्शित झालेल्या 'रंगतारी' या गाण्याने यूट्युबवरील लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. बॉलीवूडच्या आगामी 'लवरात्री' या चित्रपटासाठी हनी सिंगने हे गाणे गायले आहे. हे गाणे यूट्युबवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये गाण्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. यापूर्वी यूट्युबवर हिट ठरलेल्या 'कन्या वेस्ट' आणि 'मारून ५' या दोन्ही गाण्यांना 'रंगतारी'ने मागे टाकल्याचे हनी सिंगने सांगितले. गेल्या काही वर्षांत हनी सिंगने अनेक हीट गाणी दिली आहेत. ही गाणी तरुणाईमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली होती.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App