facebook pixel
chevron_right Top
transparent
'जेएनयू' वर पुन्हा 'लाल बावटा', अभाविप दुसऱ्या क्रमांकावर
दिल्लीच्या विख्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्या संघटनांच्या 'लेफ्ट युनिटी' ला स्पष्ट बहुमत मिळालंय. तर डाव्यांचा गड सर करण्यासाठी पूर्ण ताकद लावणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दुसऱ्या क्रमांकावर समाधन मानावं लागलं. विद्यार्थी संघाच्या चार महत्वाच्या पदांसाठी शुक्रवारी मतदान झालं होतं. नंतर मतमोजणीला सुरवातही झाली होती. मात्र काही कारणांमुळे मतमोजणी 12 तास लांबणीवर पडली होती. या निकालांमुळे जेएनयुवरचं डाव्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. JNU च्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत विविध चार डाव्या संघटनांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App