facebook pixel
chevron_right Top
transparent
प्रशांत किशोर राजकारणात, जेडीयूत केला प्रवेश-Maharashtra Times
पाटणाः लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार असलेले प्रशांत किशोर आता स्वतः राजकारणात उतरले आहेत. पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट असलेल्या प्रशांत किशोर यांनी नितीशकुमार यांच्या जेडीयूमध्ये आज प्रवेश केला. पाटणातील जेडीयूच्या कार्यकारिणीच्या बैठकीत नितीशकुमार यांनी किशोर यांना पक्षाची सदस्यता दिली. २०१४ लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या रणनीतीमुळे भाजपला गेल्या तीन दशकातील सर्वांत मोठा विजय मिळवता आला. याविजयामुळे प्रशांत किशोर चर्चेत आले. आता त्यांनी नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलात प्रवेश केला. २०१५ला झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीवेळी नितीशकुमार यांच्या जेडीयूसाठी रणनीती तयार केली होती.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App