facebook pixel
chevron_right Top
transparent
सातारा गणपती विसर्जन वाद, कृत्रिम तलावाचं बांधकाम सुरु
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी परखड भूमिका घेतल्यानंतर गणपती विसर्जनाच्या वादाला तोंड फुटलं होतं. या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या कण्हेर धरणाचा पर्याय काढून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शहरातच विसर्जन झाले पाहिजे, अशी भूमिका घेतली. प्रशासनाने रात्रीपासून सातारा शहरातच कृत्रिम तळं उभं करण्यास सुरुवात केली. त्यासाठी जेसीबी, पोकलेन लावून खोदकाम सुरु आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App