facebook pixel
chevron_right Top
transparent
पणजीमध्ये खडूपासून बनवलेला गणराया देतोय सामाजिक संदेश
सामना प्रतिनिधी, पणजी गोव्यात गणेशोत्सवात घरगुती गणपती मोठ्या प्रमाणात पूजले जातात. अलिकडे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होऊ लागले आहेत. राजधानी पणजी मधील मळा भागातील युवा मंडळाने 5 हजार खडूपासून साकारलेल्या साडे आठ फुटी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. युवा मंडळाने 1 महिना राबून 5 हजार खडूंच्या साहाय्याने ही मूर्ती साकारली आहे. खडूचे टिकली एवढे तुकडे करून त्यापासून ही मूर्ती साकारण्यात आली आहे. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे दर्शन घेणाऱ्या भाविकांनी गणपती समोरची घंटा वाजवली की गणपती आपल्या पाटीवर भक्तांसाठी संदेश लिहायला सुरुवात करतो.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App