facebook pixel
chevron_right Top
transparent
गोव्यात ख्रिश्चन धर्मीयांच्या घरात होते गणेश चतुर्थी
सामना प्रतिनिधी, पणजी गोव्यात हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लीम बांधव एकमेकांच्या सणाउत्सवात सहभागी होऊन गेली शेकडो वर्षे धार्मिक सलोखा जपत आलेले आहेत. कधी दिवाळीत नरकासूर करताना मुस्लीम बांधव सहभागी होतात तर कधी ख्रिश्चन बांधव गणेशोत्सव साजरा करतात. राजधानी पणजी पासून 8 किमी अंतरावर असलेल्या वेरे गावात राहत असलेले माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे वरिष्ठ अधिकारी जॉन आगियार गेल्या 3 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत. यंदा देखील आकर्षक मखरात पिंडीजवळ घेऊन बसलेल्या गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आगियार कुटुंबीयांनी केली आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App