facebook pixel
chevron_right Top
transparent
इस्त्रोची आणखी एक झेप, आज अवकाशात सोडणार दोन उपग्रह
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'इस्त्रो' आज दोन उपग्रह प्रक्षेपीत करणार आहे. पीएसएलव्ही सी- 42 च्या मदतीने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण होणार असून वर्षभरातलं इस्रोचं हे तिसरं प्रक्षेपण असेल. तर पीएसएलव्ही सी- 42 या प्रक्षेपक वाहकाचं हे 44 वं उड्डाण आहे. शनिवारीच या उड्डाणाची उलटी गिणती सुरू झाली. रविवारी रात्री 10 वाजून सात मिनिटांनी हे उपग्रह सोडण्यात येणार आहेत. पीएसएलव्ही सी 42 आपल्यासोबत 'नोवासर' आणि 'एस 1- 4' हे दोन उपग्रह ही घेऊन जाणार आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App