facebook pixel
chevron_right Sports
transparent
पोलंडमधील स्पर्धेत मेरी कोमला सुवर्णपदक, मनिषाची रौप्यपदकाची कमाई
भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने, पोलंड येथील ग्लिविसेत सुरु असलेल्या सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ४८ किलो वजनी गटात मेरी कोमने कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा ५-० ने पराभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. राष्ट्रकुल स्पर्धेनंतर झालेल्या दुखापतीमुळे मेरी कोमने आशियाई स्पर्धांमधून माघार घेतली होती. मात्र यानंतर पोलंडमधील स्पर्धेमधून पुनरागमन करत मेरी कोमने सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. भारताच्या मनिषानेही ५४ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. अवश्य वाचा - सरिताला कांस्यपदक.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App