facebook pixel
chevron_right Business
transparent
करूया 'एसआयपी'चा श्रीगणेशा!
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात 'एसआयपी' हा शेअर बाजारात प्रवेश करण्याचा अत्यंत सोपा, कमी जोखीम असलेला आणि दीर्घकाळामध्ये चांगले फायदे देणारा पर्याय आहे, हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. मात्र, दुर्दैवाने गुंतवणुकीचा हा उत्तम पर्याय आपल्याकडील सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत अजूनही पुरेशा प्रमाणात पोचलेला नाही. शेअर बाजारात 'भीती आणि लोभ' हे सर्वांत मोठे शत्रू आहेत. त्या शत्रूंवर 'एसआयपी' गुंतवणूकदार मात करू शकतो. 'एसआयपी'च्या मार्गाने गुंतवणूक केल्यास बाजाराची स्थिती अजिबात न पाहता गुंतवणूकदार शांतपणे आणि शिस्तबद्धपणे बाजारात प्रवेश करत राहतो.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App