facebook pixel
chevron_right Top
transparent
रणनीतीकार प्रशांत किशोर राजकारणाच्या मैदानात, जदयूमध्ये केला प्रवेश
निवडणुकांचे रणनीतीकार आणि इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (आय- पॅक)चे संस्थापक प्रशांत किशोर आता खुद्द राजकारणाच्या मैदानात आपले नशीब आजमावणार आहेत. प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड(जदयू)मध्ये प्रवेश केला आहे. रविवारी बिहारची राजधानी पाटणामध्ये जदयू कार्यकारिणीच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी औपचारिकरित्या जदयूत प्रवेश केला. बिहार विधानसभेच्या २०१५ च्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या विजयात प्रशांत किशोर यांचा मोठा हात होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपाठोपाठ बिहार विधानसभा निवडणुकीत भल्याभल्यांना चकित करणारे 'निवडणूक व्यवस्थापन गुरू' प्रशांत किशोर यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App