facebook pixel
chevron_right Top
transparent
प्रशांत किशोर जेडीयूत प्रवेश करणार, काँग्रेस-भाजपमध्ये खळबळ
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या निवडणुकीतील यशामध्ये निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना मोठा वाटा आहे. हेच प्रशांत किशोर आज जेडीयूमध्ये प्रवेश करणार आहेत. पाटणा येथील नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जेडीयूची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर येत्या काळात जेडीयूमध्ये आणि बिहार सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतील. नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना नंबर दोनचं पद देण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जात आहे. प्रशांत किशोर पक्ष आणि सरकार यांच्यात मध्यस्थीचं काम करणार आहेत. याशिवाय येत्या काळात प्रशांत किशोर निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याच्याही चर्चा आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App