facebook pixel
chevron_right Top
transparent
प्रशांत किशोर, नितीश कुमार नवे राजकीय समीकरण
राजकीय समीक्षक प्रशांत किशोर हे राजकारणात प्रवेश करणार आहेत. त्यांनी या नव्या इनिंगची सुरवात बिहार राज्यातून करण्याचा निर्णय घेतला आहे. आज प्रशांत किशोर बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (जदयू) अध्यक्ष नितिश कुमार यांच्या उपस्थित जदयू या पक्षात प्रवेश करणार आहेत. प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच जनता दलाच्या कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रशांत किशोर यांनी याबाबत अधिकृत ट्विट करुन सूचना दिली आहे. बिहारमधून नव्या प्रवासाला सुरवात करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, अशा आशयाचे ट्विट प्रशांत किशोर यांनी केले आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App