facebook pixel
chevron_right Top
transparent
गोव्यात गणपतीच्या शेजारी साकारली नारळाची आरास
सामना प्रतिनिधी, पणजी निळेशार समुद्र किनारे आणि किनाऱ्यावरील माडाच्या बागा हे गोव्यात सर्वत्र पाहायला मिळतात. ताळगावमधील ओडशेल भागात समुद्र किनारी माडांच्या बागेत राहणाऱ्या कुंकळ्येकर कुटुंबाने माडाच्या सर्व भागांचा वापर करून बनवलेला गणपती सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. कुंकळ्येकर यांच्या घरात प्रवेश करताच दरवाजावर नारळाच्या हिरव्या झावळ्यांपासून बनवलेला कमान आपले स्वागत करते. घरच्या हॉलमध्ये प्रवेश करताच आपण नारळाच्या घरात गेल्याचा भास आपल्याला होतो. गणपती आला की लोक भिंती रंगवतात. कुंकळ्येकर यांनी मात्र आपल्या घराच्या भिंतीना नारळाच्या किशांचा साज चढ़वला आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App