facebook pixel
chevron_right Top
transparent
नवी मुंबईत 'सिडको'च्या 15 हजार घरांसाठी 2 लाख अर्ज
सिडकोच्या माध्यमातून घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या पाच नोडमध्ये अल्प उत्पन्न आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 15 हजारच्या आसपास घरं उभारली जात आहेत. अपेक्षेप्रमाणे या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्वसामान्य ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सिडकोने विविध आर्थिक गटांसाठी नवी मुंबई क्षेत्रात पुढील वर्षभरात 55 हजार घरं बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी 14 हजार 820 घरांचं बांधकाम प्रगतिपथावर आहे. एमएमआरडीए रेंजमध्ये म्हणजेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली भागात ज्यांच्या नावावर घर आहे, त्यांना या घराचा लाभ घेता येणार नाही.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App