facebook pixel
chevron_right Top
transparent
पेट्रोल-डिझेल दरवाढीने फरक पडत नाही, कारण मला फुकट मिळतं
पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किमतींमुळे मला काही फरक पडत नाहीये, कारण मी एक मंत्री आहे, त्यामुळे मला मोफत पेट्रोल-डिझेल मिळतं असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. माझं मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसेल, पण इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे जनता मेटाकुटीला आली आहे हे मला समजतंय, दर कमी व्हायला हवेत, असंही आठवले पुढे म्हणाले. राजस्थानच्या जयपूरमध्ये एका कार्यक्रमात आठवले बोलत होते. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी व्हायला हवे. माझ्या पक्षाचीही हीच भूमिका आहे. केंद्र सरकारही आता इंधानचे दर नियंत्रणात आणण्याबाबत आता गंभीरतेने विचार करत आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App