facebook pixel
chevron_right Top
transparent
नागपूरच्या महापौरांचा नवा विक्रम, स्वतःच्या मुलाला पीए दाखवून नेलं अमेरिकेच्या दौऱ्यावर
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी नवा विक्रम केलाय. गेल्या 11 महिन्यात त्यांनी 11 परदेश दौरे केले आहेत. अमेरिकेच्या दौऱ्यात तर त्यांनी आणखी कमाल केलीय. स्वतःचा मुलगा प्रियश याला पीए असल्याचं दाखवून त्यांनी त्याला अमेरिकेला नेलं. आता या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात असून नागपूर शहर भाजपनेही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केलीय. तर महापौर नंदा जिचकार यांनी स्पष्टीकरण देत बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय. माझा मुलगा हा माझं सोशल मीडिया अकाऊंट हाताळतो त्यामुळे मी त्याला सोबत नेलं अशी सारवासारव त्यांनी केलीय.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App