facebook pixel
chevron_right Top
transparent
मंत्री असल्याने फुकटात इंधन, दरवाढीचा फटका नाही : आठवले
'मंत्री असल्यामुळे मला इंधनभत्ता मिळतो. त्यामुळे इंधन दरवाढीची झळ मला बसलेली नाही. मात्र मंत्रिपद गेल्यावर मला पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांचा नक्कीच फटका बसेल' असं आठवले म्हणाले. रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले केंद्रात सामाजिक न्याय विभागाचं मंत्रिपद भूषवत आहेत. जयपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. इंधन दरवाढीचा फटका तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात बसला आहे का, असा प्रश्न आठवलेंना विचारण्यात आला होता. 'इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना त्रास होतो, हे मी समजू शकतो. दर कमी करणं ही सरकारची जबाबदारी आहे. राज्यांनी करकपात केली, तर हे शक्य होईल.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App