facebook pixel
chevron_right Top
transparent
न्यायाधीशांच्या रिक्त जागा भरण्यासाठी १५ वर्ष?-Maharashtra Times
नवी दिल्ली देशभरातील २४ हायकोर्टातील न्यायाधीशांच्या रिक्त जागा भरण्यासाठी १५ वर्षे लागण्याची शक्यता आहे. सध्या देशातील २४ हायकोर्टात ४२७ न्यायाधीशपदाच्या रिक्त जागा आहेत. सध्या ज्या वेगाने न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यानुसार ही ४२७ पदे भरण्यासाठी १५ वर्षे लागणार आहेत. सध्या उच्च न्यायालयात १०७९ न्यायाधीशपदं आहेत. त्यापैकी सध्या ६५२ न्यायाधीश कार्यरत आहेत. हायकोर्टातील न्यायाधीशांच्या रिक्त जागांची संख्या ४० टक्क्यापर्यंत पोहचली आहे. केंद्र सरकारने मागील काही वर्षात हायकोर्टात सर्वाधिक न्यायाधीशांच्या रिक्त जागा भरल्या आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App