facebook pixel
chevron_right Sports
transparent
कठीण काळात सचिनने मला आधार दिला
भारतीय हॉकी संघाचा अनुभवी खेळाडू सरदार सिंहने नुकतीच आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली. गेली अनेक वर्ष भारतीय हॉकीची जबाबदारी पेलल्यानंतर सरदार सिंहने अचानक निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्याने अचानक जाहीर केलेल्या निवृत्तीमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला हॉकी विश्वचषक, आणि २०२० सालात टोकीयोमध्ये होणारं ऑलिम्पीक या स्पर्धांमध्ये सरदार खेळेल अशी आशा सर्वांनी व्यक्त केली होती. मात्र आशियाई खेळांमध्ये भारतीय संघाने केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर सरदारवर निवृत्तीसाठीचा दबाव वाढत होता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App