facebook pixel
chevron_right Top
transparent
पेट्रोलच्या किंमती लवकरच आटोक्यात
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी, तसेच रुपयाची घसरण थांबवण्याच्या दृष्टीने काय उपाय करता येईल यावर विचार सुरू असून केंद्र सरकार लवकरात लवकर तोडगा काढेल, असे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमागे आंतरराष्ट्रीय कारणे असल्याचेही ते म्हणाले. तेलाच्या किंमती ठरवण्याचा अधिकार आता केंद्राकडे राहिला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतींमध्ये चढ उतार होतात तसे दर कमी जास्त होतात. लोकांना त्रास सहन करावा लागतोय याची केंद्र सरकारला जाणीव असून तेलाच्या किंमती कमी करण्याचे उपाय शोधणं सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App