facebook pixel
chevron_right Top
transparent
पर्रिकरांची राजीनाम्याची तयारी, गोव्याचा नवा मुख्यमंत्री आज ठरणार?
स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. तिसऱ्यांदा अमेरिकेहून परतल्यानंतर पर्रिकर पुन्हा मंत्रालयात सक्रीय होतील अशी अपेक्षा होती, मात्र प्रकृती साथ देत नसल्याने त्यांना मंत्रालयात जाऊन काम करणे शक्य होत नव्हते. काल पुन्हा त्यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्समध्ये (एम्स) दाखल करण्यात आले. काम करणं शक्य होत नसल्याने त्यांनी राजीनाम्याची तयारी यापूर्वीच दर्शवली होती. परिणामी, पर्रिकर काही काळासाठी मुख्यमंत्री पद सोडणार आसल्याची माहिती पुढे येत आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App