facebook pixel
chevron_right Technology
transparent
यूजरच्या डोळ्यांच्या काळजीसाठी व्हॉट्सअॅपचं नवं फीचर
व्हॉट्सअॅपने आपल्या यूजरच्या गरजा लक्षात घेत वेळोवळी अॅपमध्ये गरजेचे बदल केले आहेत. नेहमी नवनवीन फीचर आणल्यामुळे व्हॉट्सअॅप सध्या सर्वाधिक लोकप्रिय सोशल मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपने पुन्हा एकदा आपल्या यूजरसाठी नवीन फीचर आणण्याची तयारी दाखवली आहे. लवकरच व्हॉट्सअॅप आपल्या यूजरसाठी आणखी एक अपडेट घेऊन येत आहे. WABetaInfoच्या वृत्तानुसार नवीन अपडेटनंतर व्हॉट्सअॅपमध्ये आपल्याला 'डार्क मोड' हा पर्याय दिसणार आहे. यावर्षाच्या शेवटी व्हॉट्सअॅप हे फीचर घेऊन येण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅपच्याआधी यूट्युब, ट्विटर, डिस्कोर्ड आणि रेडडिटसारख्या अॅप्समध्ये 'डार्क मोड'चा पर्याय देण्यात आला आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App