facebook pixel
chevron_right Top
transparent
Asia cup 2018 : पहिल्याच सामन्यात बांगलादेशकडून श्रीलंकेचा धु्व्वा
आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला 137 धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली आहे. बांगलादेशने पहिली फलंदाजी करत श्रीलंकेला 262 धावाचं लक्ष दिलं होतं. मात्र बांगलादेशच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंका संघाचा निभाव लागला नाही आणि अवघ्या 124 धावांत श्रीलंकेचा संघ ऑल आऊट झाला. बांगलादेशच्या जलद आणि फिरकीपटू गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या खेळाडूंना खेळपट्टीवर टीकूच दिलं नाही. आठव्या स्थानी खेळायला आलेल्या दिलरुवान परेराने श्रीलंकेकडून सर्वाधिक 29 धावा केल्या, तर सलामीला आलेल्या उपुल थरगाने 27 धावा केल्या. लंकेच्या सहा फलंदाजांना तर दुहेरी आकडही गाठता आला नाही.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App