facebook pixel
chevron_right Top
transparent
शाळा भीकेचा कटोरा घेऊन सरकारकडे का येतात? : जावडेकर
जगभरातील अनेक शैक्षणिक संस्था कोण चालवतात? नामांकित विश्वविद्यापीठं कोणामुळे चालतात? माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीमुळेच. जे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत, त्यांनी आपापल्या शाळेला मदत केली आहे. किंबहुना ही माजी विद्यार्थ्यांची जबाबदारीच आहे, असंही जावडेकर म्हणाले. शाळा नेहमी भीकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारात येतात. अरे, मदत तर तुमच्या घरातच पडलेली आहे. माजी विद्यार्थी तुमचं देणं लागतात, असं प्रकाश जावडेकर म्हणाले. मात्र जावडेकरांच्या या वक्तव्यामुळे ट्विटरवर नाराजीचा सूर उमटला आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे. अन्य शाळांसाठी हा आदर्शच आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App