facebook pixel
chevron_right Top
transparent
कश्मीरात मोस्ट वॉण्टेड गुलजार अहमदसह पाच दहशतवाद्यांना कंठस्नान
सामना ऑनलाईन । श्रीनगर. जम्मू-कश्मीरात कुलगाम जिल्ह्यात शनिवारी लष्कर-ए-तोयबा आणि हिजबूल मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात बँकेची कॅश व्हॅन लुटून पाच पोलीस आणि दोन बँक कर्मचाऱ्यांची हत्या करणारा दहशतवादी गुलजार अहमद पादारला कंठस्नान घालण्यात आले आहे. कश्मीर खोऱ्यातील अनेक बँक लुटीमध्ये गुलजार अहमद 'मोस्ट वॉण्टेड' होता. दरम्यान या चकमकीवेळी स्थानिक माथेफिरू नागरिकांनी जवानांवर दगडफेक केली. यावेळी जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडीत गोळीबार केला. त्यात एक नागरिक ठार आणि 10 जण जखमी झाले आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App