facebook pixel
chevron_right Top
transparent
कुलगाममध्ये पाच दहशतवादी मारले
जम्मू-काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी लष्करे तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन या संघटनांच्या पाच दहशतवाद्यांना ठार मारले. मारलेल्यांपैकी एक जण गेल्या वर्षी रोख रक्कम नेणाऱ्या व्हॅनवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी काल (ता. 14) रात्रीपासून कुलगाममधील काझीगुंड गावाला वेढा घालत शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनी प्रथम परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून नंतर प्रतिहल्ला केला. यात पाच दहशतवादी मारले गेले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App