facebook pixel
chevron_right Sports
transparent
नेटमधील सरावासाठी ढाक्‍यात पाच नवोदित गोलंदाज दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी फलंदाजांना दर्जेदार सराव मिळावा म्हणून बीसीसीआय'ने अ' संघातील पाच गोलंदाजांना धाडले आहे. मध्य प्रदेशचा आवेश खान, कर्नाटकचा एम. प्रसिध कृष्णा, पंजाबचा सिद्धार्थ कौल असे तीन वेगवान गोलंदाज, डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम, लेगस्पिनर मयांक मार्कंडे पुढील तीन दिवस नेटमध्ये मारा करतील. आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यातील झटपट सामन्यांसाठी कौल याच कारणासाठी संघाबरोबर होता. आवेशचा अपवाद सोडल्यास इतर चौघे चौरंगी स्पर्धेत अ' व ब' संघाकडून खेळले. यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेचाही सहभाग होता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App