facebook pixel
chevron_right Top
transparent
इंधनाचं 'गणित' (भरत फाटक)
गेल्या महिनाभरात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे दर घसरलेले एकदम नजरेत भरू लागले आहेत. 67-68 च्या पातळीत असणारा अमेरिकी डॉलर आता 72 रुपयांच्या पुढं गेला आहे. याचबरोबर कच्च्या तेलाचे भाव एका पिंपाला 77 डॉलर्सना भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या किंमती वाढल्यामुळं भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भावही पाच वर्षांतील उच्चांकाच्या स्तरावर गेले आहेत. साहजिकच या भाववाढीचा चटका प्रत्येकाला जाणवत आहे आणि सर्वच माध्यमांमधून या विषयाच्या चर्चेला उधाणच आलं आहे. पेट्रोलियम उत्पादनं जीएसटीच्या कक्षेत येत नसल्यानं या चर्चेत इंधनावरच्या करांचा पैलूही केंद्रस्थानी येत आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App