facebook pixel
chevron_right Sports
transparent
हिंदुस्थानच्या संघांनी निवड न झालेल्या कबड्डीपटूंचे आव्हान स्वीकारले नाही
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी पाठविलेल्या हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांच्या निवडीमध्ये अर्थपूर्ण वशिलेबाजी झालेली आहे. हे निवड झालेले संघ आणि निवड न झालेल्या खेळाडूंचे संघ यांच्यात सामना झाल्यास संघनिवड समितीचे पितळ उघडे पडेल अशी याचिका एका माजी कबड्डीपटूने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी हे सामने होणार होते, मात्र आशियाई क्रीडा स्पर्धांत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणारे कबड्डीपटू पळपुटे ठरले. निवड न झालेल्या खेळाडूंचे आव्हान त्यांनी स्वीकारलेच नाही, मात्र या प्रकरणामुळे हिंदुस्थानच्या कबड्डीमध्ये मोठी उलथापलथ होईल एवढे नक्की.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App