facebook pixel
chevron_right Sports
transparent
मुंबई मॅरेथॉनच्या शिरपेचात मानाचा तुरा, गोल्ड लेबलचा दर्जा
सामना ऑनलाईन । मुंबई. मुंबई मॅरेथॉनच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. आता या शर्यतीला गोल्ड लेबलचा दर्जा देण्यात आला आहे. 'आयएएएफ' म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स फेडरेशनकडून या मानाच्या शर्यतीला हा मान देण्यात आला आहे. 20 जानेवारी 2019 रोजी मुंबई मॅरेथॉनचे 16 वे पर्व पार पडले जाणार आहे. तब्बल 46 हजार स्पर्धक या स्पर्धेत भाग घेणार आहेत. कोणत्याही मॅरेथॉन स्पर्धेला गोल्ड लेबलचा दर्जा देत असताना 'आयएएएफ'चे काही निकष ठरवले गेलेले असतात.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App