facebook pixel
chevron_right Top
transparent
लठ्ठपणाच्या सुटकेसाठी मानसिकता बदला-Maharashtra Times
म.टा.विशेष प्रतिनिधी,नागपूर लठ्ठपणा ही जगातील मोठी समस्या आहे. जगभरातील लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. एका सर्वेक्षणानुसार भारतात ९८ लाख पुरूष तर २ कोटी महिला लठ्ठपणाचे शिकार आहेत. मधुमेहाचे कारणही लठ्ठपणाच आहे. लठ्ठपणाचे कारण अनेक असले तरी तो कसा दूर करायचा यासाठी स्वत:ची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. कुणीतरी दुसरा येऊन आपला लठ्ठपणा दूर करेल ही मानसिकता आपण जोपर्यंत बदलणार नाही, तोपर्यंत लठ्ठपणा दूर करता येणार नाही, असे प्रतिपादन लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App