facebook pixel
chevron_right Top
transparent
विदर्भातील चार जिल्ह्यांत पेट्रोल नव्वदीपार-Maharashtra Times
टीम मटा रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे शनिवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. विदर्भातील चार जिल्ह्यांत नव्वदीपारचा उच्चांक नोंदविण्यात आला. अमरावतीत सर्वाधिक ९०.२६ तर बुलडाणा ९०.२१, गोंदिया ९०.०८, यवतमाळ ९०.२ रुपये प्रती लिटर पेट्रोलचे दर होते. यापूर्वी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे १४ पैसे आणि १२ पैशांची वाढ झाली होती. शनिवारी पेट्रोल ३४ पैसे तर डिझेल २५ पैशांनी महागले. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षाने भारत बंद केला होता. त्यानंतरही दरवाढ झाली होती. फक्त बुधवारी इंधन दरवाढीला ब्रेक बसला होता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App