facebook pixel
chevron_right Top
transparent
भाजपला हवेत मतदारांच्या गाड्यांचे क्रमांक-Maharashtra Times
विशेष प्रतिनिधी,नागपूर बुथप्रमुख आणि पेजप्रमुख असे अत्यंत अतिसूक्ष्म नियोजन असलेल्या भाजपने आता मतदारांच्या घरात डोकावणे सुरू केले आहे. आतापर्यंत मतदारांच्या घरात किती मतदार आहेत व कौटुंबिक पार्श्वभूमी काय, इथपर्यंत मर्यादित असलेल्या भाजपने आता मतदारांच्या वाहनांचे क्रमांकही गोळा करण्यास सुरुवात केली आहे. अनेक नगरसेवकांना भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांकडून तशा सूचना करण्यात आल्या असून, किमान दहापैकी पाच मतदारांच्या घरातील वाहने किती व क्रमांक काय, याची माहिती गोळा करण्यास सांगितले आहे. पक्षाच्या या भूमिकेबद्दल नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असून, 'उघडपणे बोलता येत नाही', असा सूर आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App