facebook pixel
chevron_right Top
transparent
९५३ सोसायट्यांवर 'कचरा' खटले-Maharashtra Times
कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने बजावलेल्या नोटिसांना केराची टोपली दाखवणे गृहनिर्माण संस्थांना महागात पडले आहे. पालिकेने या संस्थांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला असून, तब्बल ९६३ सोसायट्यांना न्यायालयात खेचण्यात आले आहे. यापैकी २७८ प्रकरणी मुंबईच्या विविध न्यायालयांत खटले सुरू झाले आहेत, तर उर्वरित प्रकरणी लवकरच खटले सुरू होतील. या सोसायट्यांवर एमआरटीपी कायद्यानुसार तसेच इतर कारवाईबाबतचा फैसला न्यायालयातच होणार आहे. २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या तसेच दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट सोसायटीच्या परिसरातच करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App