facebook pixel
chevron_right Top
transparent
'आसरा' अॅपला भरघोस प्रतिसाद-Maharashtra Times
प्रतिनिधी, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअतंर्गत (एसआरए) किती योजना मंजूर झाल्या, योजनेची सद्यस्थिती काय आहे, शहरात किती झोपड्या आहेत, किती प्रकल्पांना ओसी प्रमाणपत्र मिळाले आहे, याची इत्यंभूत माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने विकसित केलेले 'आसरा' हे अॅप अवघ्या पाच दिवसांत ९३ हजार लोकांनी डाऊनलोड केले आहे. पुढील काही दिवसांत याच अॅपवर सगळी कामे होतील. ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या अॅपचा शुभारंभ झाला होता. या अॅपमुळे सगळी माहिती एका क्लिकवर मिळणार असल्याने वांद्रे येथील एसआरए मुख्यालयाचा फेरा टळेल.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App