facebook pixel
chevron_right Sports
transparent
मुशफिकरच्या खेळीमुळे बांगलादेशला आधार-Maharashtra Times
मुशफिकर रहीमच्या १४४ धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे बांगलादेशने आशिया कप क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ४९.३ षटकांत २६१ धावा केल्या. त्याला उत्तर देताना श्रीलंकेने २ बाद ३२ धावा केल्या होत्या. आशिया कप क्रिकेट स्पर्धेला इथे या सामन्याने शनिवारी प्रारंभ झाला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण अवघ्या २ धावांत त्यांचे तीन फलंदाज माघारी परतले. मलिंगाने सलामीवीरांना शून्यावर बाद करून धक्का दिला. पण मुशफिकर आणि मोहम्मद मिथुन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी करून संघाची घसरण रोखली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App