facebook pixel
chevron_right Top
transparent
पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींवर लवकरच तोडगा काढू
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी, तसेच रुपयाची घसरण थांबवण्याच्या दृष्टीने काय उपाय करता येईल यावर विचार सुरू असून, केंद्र सरकार लवकरात लवकर तोडगा काढेल, असे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमागेही आंतरराष्ट्रीय कारणं असल्याचे ते म्हणाले. हैद्राबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शहा यांनी पत्रकारांना माहिती दिली. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत बोबतांना त्यांनी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचीही घसरण सुरू असल्याचे मान्य करत, त्याबाबत चिंता व्यक्त केली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App