facebook pixel
chevron_right Business
transparent
जेटली म्हणाले, 'आर्थिक स्थिती उत्तम'; तेलाच्या किमतीबाबत मौन-Maharashtra Times
केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) ३.३ टक्के इतक्या वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठण्यासाठी कटीबद्ध असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आढावा बैठकीनंतर स्पष्ट केले आहे. या वित्तीय वर्षात करापोटी चांगला महसूल जमा होईल असा विश्वास व्यक्त करताना सरकार निर्गुंतवणूकीचे आपले लक्ष्यही पूर्ण करेल असेही जेटली म्हणाले. आर्थिक आढावा घेत आपले लक्ष्य गाठण्याबाबत विश्वास व्यक्त करणारे अर्थमंत्री जेटली यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती, तसेच रुपयाची घसरण या विषयावर मात्र मौन बाळगले. पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतलेल्या आर्थिक आढावा बैठकीनंतर जेटली बोलत होते.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App