facebook pixel
chevron_right Top
transparent
२०१९ मधील निवडणुकीबाबत रामदास आठवलेंनी वर्तवले भाकित
क्रिकेट व अन्य खेळांसह सैन्यभरतीमध्येही आरक्षण दिले पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. २०१९ मधील निवडणुकीत भाजपाला ३०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असे भाकितही त्यांनी वर्तवले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे शनिवारी राजस्थानमध्ये होते. जयपूरमधील पत्रकार परिषदेत रामदास आठवले म्हणाले, कोणी कितीही आंदोलने करावीत. पण एससी- एसटी व ओबीसींना मिळालेले आरक्षण बंद करता येणार नाही. सवर्णांमध्येही सगळेच श्रीमंत नसतील. त्यामुळे जातीय आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे, असे त्यांनी सांगितले. अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App