facebook pixel
chevron_right Top
transparent
उपचाराला पैसे नसल्याने पतीचा मृत्यू, पत्नीनं उभारलं हॉस्पिटल
आजारपण काय असतं हे रुग्णांच्या नातेवाईकांना नीट माहित असतं. त्याही पेक्षा गरीबाच्या घरात आजार काय असतो, हे तर न विचारलेलंच बरं. कोलकात्याच्या सुभाषीनी मिस्त्री या २३ वर्षांच्या होत्या, तेव्हा पैसे नसल्याने उपचारांअभावी त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. यानंतर सुभाषिनी यांनी आयुष्यात अनेक खस्ताखाल्या. आपल्या ४ मुलांना सांभाळत, भाजीपाला विकला. प्रसंगी मुलाला अनाथालयात टाकलं, पण गरीबांसाठी हॉस्पिटल उभारलं. भारत सरकारने त्यांना या कार्याबद्दल पद्मश्रीने गौरवलं आहे, त्या आता ७५ वर्षांच्या आहेत. सुभाषनी यांचा जन्म १९४३ साली बंगालमध्ये भीषण दुष्काळ असताना झाला होता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App