facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
अबब! ४०० किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजली 'पद्मावती'
'परफेक्शन' हा शब्द जितक्या सहजतेने वापरता जातो तितका तो सोपा नाही. प्रत्येक गोष्टीतील बारकावे टीपत ती गोष्ट इतरांसमोर सादर करण्यासाठी बरेच प्रयत्नही करावे लागतात. संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या 'पद्मावती' या आगामी चित्रपटासाठी अशीच मेहनत घेतली आहे. ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट साकारण्यासाठी त्यांनी बरंच संशोधनही केलं. ऐतिहासिक पात्रांना रुपेरी पडद्यावर उतरवताना त्यांच्या पोशाखापासून ते दागिन्यांच्या विविध प्रकारांवरही भन्साळी यांनी विशेष लक्ष दिलं. हे सर्व मुद्दे 'पद्मावती'चा ट्रेलर पाहून लक्षात येत. या चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला तेव्हाच अनेकांचे डोळे दिपले होते.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App