facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
'उत्सव नात्यांचा' वाचकांच्या आवडीचा
मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात आपल्या प्रेक्षकांना सतत काहीतरी नवीन अनुभव देणाऱ्या झी मराठी वाहिनीने आजवर विविध उपक्रमांद्वारे प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. यावर्षी झी मराठीने पहिल्यांदाच आपला दिवाळी अंक 'उत्सव नात्यांचा' बाजारात आणला. एखाद्या मनोरंजन वाहिनीने दिवाळी अंक प्रकाशित करण्याची ही पहिलीच वेळ. झी मराठी वाहिनीने नुकतीच अठरा वर्षे पूर्ण केली. या अठरा वर्षांच्या काळात कलाकार असो की प्रेक्षक प्रत्येकजण या वाहिनीशी जोडला गेलेला आहे. याच नात्याला केंद्रस्थानी ठेवून उत्सव नात्यांचा हा दिवाळी अंक काढण्याची संकल्पना झी मराठी वाहिनीला सुचली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App