facebook pixel
chevron_right Sports
transparent
बंगालचा दबदबा कायम, तामिळ थलायवाजचा पराभव
प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात 'ब' गटात आपला दबदबा कायम राखत बंगाल वॉरियर्सने तामिळ थलायवाजच्या संघावर पुन्हा मात केली. ३४-३० अशा फरकाने सामन्यात विजय मिळवत बंगालने 'ब' गटात आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. चढाईपटू आणि बचावफळीतील खेळाडूंनी केलेली अष्टपैलू कामगिरी हे बंगालच्या आजच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरली. प्ले-ऑफच्या शर्यतीत बंगाल आधीच दाखल झाला असल्याने या सामन्याला केवळ औपचारिकता म्हणूनच महत्व प्राप्त झालं होतं. मात्र तरीही बंगालने आपल्या विजयाचा धडाका कायम ठेवला. चढाईत मणिंदर सिंहने बंगालकडून सर्वाधीक १२ गुणांची कमाई केली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App