facebook pixel
chevron_right Top
transparent
प्रणब मुखर्जी हे पंतप्रधान बनण्यासाठी अधिक योग्य व्यक्ती होते : मनमोहन सिंग
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २००४ साली आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधानपदासाठी माझ्या नावाची घोषणा केली. त्यावेळी प्रणब मुखर्जी हे नाराज होणे स्वाभाविक होते. कारण, पंतप्रधानपदासाठीचे दावेदार असलेल्या प्रणब मुखर्जी यांच्या नावाऐवजी माझ्या नावाची घोषणा झाली होती, अशी प्रांजळ कबुली माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी दिली आहे. महत्त्वाच्या बातम्या नवी दिल्लीत प्रणब मुखर्जी यांच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या खंडाचा आज प्रकाशन सोहळा पार पडला, यावेळी मनमोहन सिंग यांनी आपले सहकारी मुखर्जी यांच्यासोबतच्या नात्याचा उलगडा केला. आघाडी सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळातील त्यांची मैत्रीही त्यांनी उलगडून दाखवली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App